

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची ‘बॅगी ग्रीन कॅप’ चोरीला (David Warner Baggy Green Cap) गेली आहे. वॉर्नरने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. वॉर्नर बुधवारपासून (3 जानेवारी) पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना संपल्यानंतर वॉर्नर क्रिकेटच्या या प्रदीर्घ फॉरमॅटला अलविदा करणार आहे. पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने आपल्या कारकिर्दीतील ही शेवटची कसोटी मालिका असेल, असे जाहीर केले होते.
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने सांगितले की पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने आपली बॅगी ग्रीन कॅप गमावली आहे. ज्याच्याकडे टोपी आहे त्यांनी ती परत करावी, असे वॉर्नरने सांगितले. मेलबर्नहून सिडनीला येताना ही कॅप चोरीला गेल्याचे त्याने म्हटले आहे. वॉर्नरच्या म्हणण्यानुसार त्याने टीम हॉटेल आणि एअरलाइन्सचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
बॅगी ग्रीन कॅप म्हणजे काय?
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना देण्यात येणाऱ्या कॅपला ‘बॅगी ग्रीन’ म्हणतात. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या निमित्ताने हिरवी टोपी घालतात, समोर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा लोगो असतो.
हेही वाचा – इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅटर किती प्रकारे OUT होऊ शकतो? जाणून घ्या नियम!
बॉक्सिंग डे कसोटीनंतर डेव्हिड वॉर्नरची बॅग मेलबर्नहून सिडनीला पोहोचलेली नाही. त्याने सांगितले की ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या मोठ्या बॅगमध्ये एक लहान बॅकपॅक ठेवला होता. वॉर्नर म्हणाला की जो कोणी त्याला बॅगी ग्रीन कॅप परत करेल त्याला बॅकपॅक देईल. सिडनी कसोटीपूर्वी डेव्हिड वॉर्नरनेही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साली होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याची गरज भासल्यास तो पुनरागमन करू शकतो. वॉर्नर टी-20 लीग खेळत राहणार आहे. वॉर्नरने अलीकडेच ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!