‘त्याने पीरियड्सबद्दल विचारलं…’, बांगलादेशच्या क्रिकेटरचे सिलेक्टरवर आरोप, क्रिकेटविश्वात खळबळ!

WhatsApp Group

Bangladesh Cricketer Jahanara Alam Controversy : बांगलादेश महिला क्रिकेट संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जहानारा आलम हिने संपूर्ण क्रिकेटविश्वाला हादरा देणारा खुलासा केला आहे. सध्या मानसिक ताणामुळे विश्रांती घेत असलेली जहानारा हिने माजी निवड समिती सदस्य आणि संघ व्यवस्थापक मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

तिच्या मते, 2022 महिला वनडे वर्ल्डकपदरम्यान संघातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिला “अश्लील प्रस्ताव” देण्यात आले. ती म्हणाली की, “मी संघासोबत असताना अनेक वेळा अशा प्रकारचे अनुभव घेतले. परंतु, आपल्या करिअरचा प्रश्न असल्याने आणि समाजात ओळख टिकवण्यासाठी, आम्हाला अनेक वेळा गप्प राहावं लागतं.”

जहानारा पुढे म्हणाली, “2021 मध्ये टोहीद महमूद नावाच्या अधिकाऱ्याने सरफराज बाबू (बीसीबी समन्वयक) यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत अशोभनीय प्रस्ताव पाठवला. मी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर, मंजु भाईने माझ्याशी अपमानास्पद वर्तन सुरू केले.”

तिने सांगितले की, “मी बीसीबीचे सीईओ निजामुद्दीन चौधरी आणि महिला समिती प्रमुख नदेल चौधरी यांनाही सर्व काही सांगितले, परंतु काहीच कारवाई झाली नाही. प्रत्येक वेळी ‘तात्पुरती सोय’ केली गेली, पण त्रास सुरूच राहिला.”

जहानारा हिने न्यूझीलंडमधील एका घटनेची आठवण सांगताना धक्कादायक खुलासा केला, “तो माझ्याकडे आला, खांद्यावर हात ठेवला, मला जवळ खेचलं आणि कानाजवळ येऊन विचारलं, ‘तुझे पाळीचे दिवस किती दिवसांचे झाले?’ मी म्हणाले, ‘पाच दिवस झाले.’ त्यावर तो म्हणाला, ‘काल संपले असतील ना? संपल्यावर मला सांग, मला माझ्या साईडची काळजी घ्यायची आहे.’ तेव्हा मी फक्त म्हणाले. ‘सॉरी भाई, मला समजलं नाही.’”

जहानारा हिने सांगितले की, तो नेहमीच महिला खेळाडूंना हात धरून जवळ ओढत असे, मिठी मारत असे आणि कानाजवळ बोलत असे. खेळाडू एकमेकांत भीतीने बोलत असत, “तो आला की पुन्हा मिठी मारेल!”

हेही वाचा – कधी विचार केला होता का की एक दिवस आपण चष्मा घालून पेमेंट करू शकू? Lenskart करतंय!

या प्रकरणानंतर मंजुरुल इस्लाम आणि सरफराज बाबू यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मंजुरुल म्हणाले, “हे सर्व आरोप निराधार आहेत. माझ्या स्वभावाविषयी इतर खेळाडूंना विचारा.”

सरफराज बाबू म्हणाले, “जहानाराने ही संपूर्ण कहाणी बनवली आहे. दुर्दैवाने ती आता दिवंगत झालेल्या टोहीद महमूदलाही यात ओढत आहे. तिच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर करावेत.”

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या गंभीर प्रकरणाची नोंद घेतली असून तपासाची शक्यता व्यक्त केली आहे. उपाध्यक्ष शाखावत हुसेन यांनी सांगितले की, “हे आरोप अतिशय गंभीर आहेत. आम्ही लवकरच या संदर्भात योग्य ती कारवाई ठरवू.”

या घटनेनंतर संपूर्ण बांगलादेशी क्रिकेट विश्व हादरले आहे. चाहत्यांकडून जहानाराला मानसिक आधार मिळत असून, अनेक महिला खेळाडूंनी तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment