चॅम्पियन्स ट्रॉफी :  लक असावं तर स्टीव्ह स्मिथसारखं, सेमीफायनलमध्ये ‘असा’ बचावला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन!

WhatsApp Group

Champions Trophy 2025 :  चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नशीबाची साथ मिळाल्याचे दिसते. सामन्यादरम्यान एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. कांगारू संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने फलंदाजीदरम्यान अक्षर पटेलविरुद्ध १४ व्या षटकातील शेवटच्या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पॅडच्या कडेला लागला आणि स्टंपवर जाऊन आदळला. असे असूनही, तो आऊट होण्यापासून वाचला. आयसीसीच्या नियमामुळे त्याला बाद देण्यात आले नाही.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की चेंडू स्मिथच्या पॅडवर आदळतो आणि नंतर स्टंपवर जातो. चेंडू आदळल्यानंतर स्टंपवरील बेल्स हलत नाहीत. त्यामुळे टीम इंडियाला स्मिथची विकेट मिळाली नाही.

हेही वाचा – पासपोर्ट काढण्याआधी वाचा ‘नवीन’ नियम; आता ‘ही’ गोष्ट लागणार!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

ऑस्ट्रेलिया – कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment