अब्रार अहमदचा शुबमन गिलला ‘तिखट’ सेंडऑफ, विकेट काढल्यानंरचं सेलिब्रेशन एकदा बघाच!

WhatsApp Group

IND vs PAK :  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला २४१ धावांत गुंडाळले. यानंतर, टीम इंडियाने २ विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या. यादरम्यान, विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १४ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. शुबमन गिल ४६ धावा काढून बाद झाला. पाकिस्तानचा फिरकीपटू अब्रार अहमदने सुंदर चेंडूवर बोल्ड केले. हा चेंडू इतका भारी वळला, की त्याची नोंद स्पर्धेतील घातक चेंडूमध्ये करता येईल.

जबरदस्त फॉर्मात खेळणाऱ्या शुबमनला अब्रारने जबरदस्त चकवले. ही विकेट घेतल्यानंतर अब्रारने आपले ट्रेडमार्क सेलिब्रेशन करत चर्चा रंगवली. शुबमनने या सामन्यात ७ सुरेख चौकारांसह ४६ धावा केल्या.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा 14 हजारी कारनामा, एकमेव फलंदाज…

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, पाकिस्तानने एकेकाळी दोन विकेटच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. मग असे वाटले की २७० पेक्षा जास्त धावा होतील. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या उर्वरित ८ विकेट ९० धावांच्या आत घेतल्या. पाकिस्तानी संघ पूर्ण ५० षटकेही फलंदाजी करू शकला नाही. त्याच्याकडून सौदी शकीलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment