Independence Day 2022 : डेव्हिड वॉनर्रचं ‘भारतप्रेम’ तर पाहा..! न विसरता केलं ‘अभिमानास्पद’ काम!

WhatsApp Group

Independence Day 2022 : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकवला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये क्रिकेटपटूही सामील झाले असून चाहत्यांचे अभिनंदन करत आहेत. विशेष म्हणजे परदेशी क्रिकेटपटूही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इंस्टाग्रामच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला वॉर्नर?

डेव्हिड वॉर्नरने लिहिले, ”भारतात उपस्थित असलेल्या सर्व मित्र आणि कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.” या पोस्टमध्ये डेव्हि़ड वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये भारताला ‘दुसरं घर’ म्हटलं आहे. वॉर्नर भारतात खूप लोकप्रिय आहे, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून बराच काळ खेळला आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग आहे, डेव्हिड वॉर्नरनं आपल्या खेळाद्वारे आणि सोशल मीडियावर रीलद्वारे भारतीय चाहत्यांना वेड लावलं आहे.

हेही वाचा – “देशाचं नाव बदला आणि…”, क्रिकेटर मोहम्मद शमीच्या बायकोचं पंतप्रधान मोदींना आवाहन!

डॅरेन सॅमीनंही दिल्या शुभेच्छा!

डेव्हिड वॉर्नरशिवाय वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनंही भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॅरेन सॅमीनं टी-२० विश्वचषक ट्रॉफीसोबत एक फोटो पोस्ट केला आणि म्हटलं, ”भारताला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मी माझा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना येथे खेळलो.” टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनीही देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर आपला प्रोफाईल फोटोही बदलून तिथं तिरंगा लावला आहे. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूंनी ट्विटर, इन्स्टाग्रामवर आपले फोटो बदलून तिथं तिरंगा अपलोड केला आहे.

सचिन तेंडुलकरचा खास संदेश

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं आपल्या घरी फडकवला. ट्विटरवर खास संदेश देताना तो म्हणाला, ”तिरंगा नेहमीच माझ्या हृदयात आहे, आज माझ्या घरीही तिरंगा फडकवणार आहे. हृदयातही तिरंगा, घरातही तिरंगा. जय हिंद.”

रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे. रोहित शर्मानं यापूर्वीही अनेकवेळा देशाप्रती आपले प्रेम दाखवलं आहे. यावेळी त्यानं एक खास फोटो शेअर केला आहे. रोहितनं अभिमानाने तिरंगा पकडला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी हास्य आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानंही इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. पंड्यानं हातात तिरंगा पकडला आहे. शिखर धवननंही ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानं सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment