IPL 2026 Auction आधी मोठा बदल! चेन्नई सुपर किंग्जकडून हे 5 खेळाडू होऊ शकतात ‘रिलीज’, पाहा यादी

WhatsApp Group

IPL 2026 Auction : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या पाच वेळच्या विजेत्या संघासाठी IPL 2025 हा हंगाम स्वप्नवत ठरला नाही. एम.एस. धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील हा संघ यंदा सर्वात शेवटच्या म्हणजेच 10व्या स्थानावर राहिला. त्यामुळे आता फ्रेंचायझीने संघात मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. IPL 2026 हंगामासाठी संघ काही महत्त्वाचे आणि अनुभवी खेळाडू ‘रिलीज’ करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

1. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक वर्षे ‘मॅच विनर’ ठरलेला ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याचं नाव सध्या ट्रेड डीलमध्ये चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जडेजा राजस्थान रॉयल्सकडे (Rajasthan Royals) जाण्याची शक्यता असून त्याच्या बदल्यात संजू सॅमसन चेन्नईकडे येऊ शकतो. जडेजाचा CSK मधून ‘रिलीज’ होणं म्हणजे संघासाठी मोठा धक्का ठरेल.

2. सॅम करन (Sam Curran)

इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनलाही चेन्नई सुपर किंग्ज ‘रिलीज’ करू शकते. करनलाही जडेजा- सॅमसन ट्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. 2025 मध्ये अपेक्षित कामगिरी न करता करनला नवीन संघ शोधावा लागू शकतो.

हेही वाचा – BBC वर “फेक न्यूज”चा शिक्का! दोघांचा राजीनामा; प्रकरण काय?

3. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)

CSK ने राहुल त्रिपाठीला ₹3.4 कोटींना विकत घेतलं होतं, पण 2025 हंगामात त्याने केवळ 5 सामन्यांत 55 धावा केल्या. त्याची ही निराशाजनक कामगिरी पाहता, व्यवस्थापन त्याला ‘रिलीज’ करण्याचा निर्णय घेऊ शकते.

4. विजय शंकर (Vijay Shankar)

34 वर्षीय विजय शंकरलाही चेन्नईने ₹1.2 कोटींना घेतलं होतं. पण संघात नव्या, तरुण आणि आक्रमक खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असलेल्या CSK साठी विजय शंकरचा भविष्यातील रोल संपल्याचं मानलं जातंय.

5. श्रेयस गोपाल (Shreyas Gopal)

केवळ ₹30 लाखांमध्ये विकत घेतलेला श्रेयस गोपाल IPL 2025 मध्ये एका सामन्यातही खेळला नाही. त्यामुळे त्याला रिलीज करणे जवळजवळ निश्चित मानलं जातंय. संघाला स्पिन डिपार्टमेंटमध्ये नवीन चेहऱ्यांची गरज भासतेय.

CSK साठी मोठं पुनर्रचना वर्ष ठरणार?

IPL 2026 च्या लिलावाआधी CSK साठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. महेंद्रसिंह धोनी कर्णधारपद सोडणार का, आणि नवीन कर्णधार कोण असेल, या प्रश्नांची उत्तरंही लवकरच मिळू शकतात. संघाला पुन्हा एकदा विजेतेपदाच्या मार्गावर नेण्यासाठी चेन्नईकडून मोठे बदल अपेक्षित आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment