IPL 2023 Final : भर मैदानात CSK च्या महिला फॅनचे ‘लज्जास्पद’ कृत्य! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमाचा अंतिम सामना रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता, परंतु नाणेफेकीच्या अर्धा तास आधी सुरू झालेला पाऊस थांबला नाही आणि त्यामुळे सामना होऊ शकला नाही. पंचांनी हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) आयोजित करण्याचे ठरवले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारी हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अहमदाबादच्या मोदी स्टेडियममधील आहे. एक चेन्नईची महिला फॅन स्टेडियममधील पोलिसाला मारहाण करताना आणि ढकलताना दिसत आहे. या घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. महिलेने असे हे लज्जास्पद कृत्य का केले याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final CSK Vs GT : चला झोपा, आता ‘या’ दिवशी होणार मॅच! पंच म्हणाले, “रात्री उशिरा….”

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील फायनलचा सामना टॉसही पावसामुळे होऊ शकला नाही. नाणेफेकीच्या अर्धा तास आधी पाऊस सुरू झाला. मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीवर कव्हर टाकली. याशिवाय वेगवान गोलंदाजांच्या मार्गावरही कव्हर्स टाकण्यात आली. यानंतर पावसाचा जोर वाढला आणि विजांचा कडकडाटही सुरू झाला, त्यामुळे मोठ्या संख्येने मैदानावर जमलेले प्रेक्षक छत शोधताना दिसत होते. अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे पंचांनी आजचा अंतिम सामना पुढे ढकलून राखीव दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

नियमानुसार आयपीएल फायनलमध्ये पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाऊ शकतो. राखीव दिवशीही पाऊस पडला आणि खेळ होऊ शकला नाही तर साखळी टप्प्यातील अव्वल स्थानी असलेला संघ विजयी होईल. गतविजेत्या गुजरात टायटन्सने लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment