डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानातून पळण्याच्या तयारीत? पीएसएल बंद होणार?

WhatsApp Group

Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. बुधवारी पहाटे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यामध्ये डझनभर दहशतवादी मारले गेले. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर, गुरुवारी (८ मे) एकामागून एक झालेल्या डझनभर ड्रोन हल्ल्यांनी संपूर्ण पाकिस्तान हादरला. कराची, लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडीसारख्या शहरांमध्येही बॉम्बस्फोट झाले आहेत.

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ झालेल्या स्फोटाने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार आहे. या सामन्यात पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज हे संघ एकमेकांसमोर येतील. कराचीचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आहे आणि पेशावरचा कर्णधार बाबर आझम आहे. या स्फोटानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) वेळापत्रकानुसारच होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी सांगितले. कोणत्याही खेळाडूला देश सोडण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने देखील पुष्टी केली की भू-राजकीय परिस्थितीमुळे अद्याप कोणत्याही परदेशी खेळाडूने लीग सोडण्याची विनंती केलेली नाही.

लीगमधील सहा फ्रेंचायझींच्या किमान तीन मीडिया मॅनेजर्सनी सांगितले की, त्यांच्या संघातील कोणत्याही परदेशी खेळाडूने लीग सोडण्याची विनंती केलेली नाही. लीगमधील प्रत्येक फ्रेंचायझीच्या संघात पाच ते सहा परदेशी खेळाडू असतात. पीसीबीने सांगितले की, इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होईल.

वॉर्नरसोबत कराची किंग्ज संघाकडे मोहम्मद नबी, जेम्स विन्स, टिम सेफर्टसारखे परदेशी खेळाडू आहेत. तर पेशावरमध्ये टॉम कोहलर कॅडमोर, ल्यूक वूड, अल्झारी जोसेफ, मॅक्स ब्रायंट हे परदेशी खेळाडू आहेत. आता पाकिस्तानमध्ये खेळाडूंची सुरक्षा धोक्यात आहे. अशा परिस्थितीत, हे खेळाडू लवकरात लवकर घरी परतू इच्छितात. इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडेही अपील केले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment