वय १९, पण खेळ वाघिणीचा! महाराष्ट्राची ‘लेक’ भारताची नवी चेस चॅम्पियन

WhatsApp Group

Divya Deshmukh Chess World Champion : नागपूरची १९ वर्षीय इंटरनॅशनल मास्टर (IM) दिव्या देशमुख हिने FIDE वुमेन्स वर्ल्ड कप २०२५ जिंकत जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. तिने अंतिम फेरीत भारताचीच अनुभवी ग्रँडमास्टर (GM) कोनेरू हंपीला पराभूत करत आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवला.

दिव्याने केवळ जागतिक विजेतेपद मिळवलं नाही, तर भारताला चीनसारख्या बलाढ्य बुद्धिबळ राष्ट्राच्या वर विजय मिळवून दिला आहे. या विजयामुळे दिव्या देशमुखचे नाव आता भारताच्या चेस इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.

फायनल सामना : अनुभव विरुद्ध आत्मविश्वास

FIDE वर्ल्ड कपचा अंतिम सामना जॉर्जिया देशातील बातूमी शहरात खेळवण्यात आला. दिव्या देशमुख (वर्ल्ड रँक १८) आणि कोनेरू हंपी (वर्ल्ड रँक ५) यांच्यात दोन दिवसांचे क्लासिकल सामने झाले, जे १-१ अशा बरोबरीत संपले. त्यानंतर सोमवारी झालेल्या रॅपिड फॉरमॅटच्या सामन्यांमध्ये निर्णायक क्षण पाहायला मिळाले.

हेही वाचा – सावधान! अ‍ॅसिडिटीच्या गोळीत ‘कॅन्सरजन्य’ रसायन! भारतात चौकशीचे आदेश जारी

पहिल्या गेममध्ये दिव्याने पांढऱ्या मोहरांनी खेळ करत आक्रमक सुरुवात केली. हंपीने काळ्या मोहरांनी बचावात्मक खेळ करत सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या गेममध्ये दिव्याने काळ्या मोहरांनी सुरुवात करत हंपीवर सुरुवातीपासून दबाव टाकला. तज्ञांच्या मते, हंपीकडून वेळेच्या व्यवस्थापनात चूक झाली आणि एक मोठी चूक तिला परवडली. दिव्याने हा गेम जिंकून वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आपल्या नावावर केला.

बक्षीस आणि पुढील संधी

  • विजेती दिव्या देशमुखला ₹४२ लाख रुपये (५०,००० USD) बक्षीस मिळाले
  • उपविजेती कोनेरू हंपीला ₹३० लाख (३५,००० USD)
  • दोघींनीही आता FIDE Candidates Tournament 2026 साठी पात्रता मिळवली आहे

चायनीज प्लेयर्सचा पराभव  

दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी — दोघींनी चीनच्या आघाडीच्या महिला खेळाडूंना पराभूत करून फायनल गाठली. या विजयामुळे भारताने महिला बुद्धिबळ क्षेत्रात आपली ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment