“जर त्यानं मला…”, CSK च्या खेळाडूचा महेंद्रसिंह धोनीवर खळबळजनक आरोप? वाचा!

WhatsApp Group

Ishawar Pandey Retirement : एक दिवस भारतासाठी खेळणं हे देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. त्यापैकी काही खेळाडू भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होतात आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. तर असे काही खेळाडू आहेत, ज्यांना खेळण्याची संधीही मिळत नाही. यापैकी एक म्हणजे ईश्वर पांडे जो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग होता.

विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळलेले मोहित शर्मा, मुरली विजय, एस बद्रीनाथ आणि रवीचंद्रन अश्विनसारखे अनेक खेळाडू भारताकडून खेळले. पण असे काही खेळाडू होते ज्यांनी चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली कामगिरी केली परंतु त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता आलं नाही. त्यापैकी एक नाव म्हणजे वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे. त्यानं आता असा आरोप केला आहे की जर महेंद्रसिंह धोनीनं त्याला संधी दिली असती तर तो देशासाठी चांगली कामगिरी करू शकला असता.

हेही वाचा – IPL 2023 पूर्वी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स टीममधून ‘ब्रेकिंग’ न्यूज!

काय म्हणाला ईश्वर?

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू भारताकडून खेळले, मात्र काहींना संधी मिळाली नाही, अशी माहिती आहे. धोनीनं भारताच्या अनेक खेळाडूंचं आयुष्य बदललं आणि अनेक खेळाडूंचे भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न साकार करण्यात मोठी भूमिका बजावली. माध्यमांशी संवाद साधताना ईश्वर पांडे म्हणाला, “तेव्हा मी २३-२४ वर्षांचा होतो आणि माझा फिटनेसही खूप चांगला होता. त्यावेळी जर धोनीभाईनं मला संधी दिली असती आणि मी देशासाठी चांगली कामगिरी केली असती तर माझी कारकीर्द नक्कीच वेगळी असती.”

मध्य प्रदेशात जन्मलेल्या या ईश्वरनं चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून आयपीएलही खेळलं आहे. तसेच, तो बराच काळ मध्य प्रदेशच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या गोलंदाजीचा प्रमुख भाग आहे. ईश्वर पांडेनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो भारतासाठी एकही सामना खेळू शकला नाही. त्यानं आपल्या निवृत्ती पोस्टमध्ये लिहिलं, “माझ्या देशासाठी एक सामनाही खेळण्याइतका मी भाग्यवान नव्हतो, परंतु तरीही भारतीय संघाचा भाग असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असेल. मला निवडल्याबद्दल मी RPSG आणि CSK चे आभार मानू इच्छितो. माझ्यासाठी CSK संघाचा भाग असणे आणि IPL फायनल खेळणे आणि चॅम्पियन्स लीग जिंकणे हे विशेष होते. महेंद्रसिंग धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली २ वर्षे CSK कडून खेळताना मी खरोखरच आनंद लुटला.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment