IND vs AUS 1st T20 : आज रंगणार पहिली मॅच..! कधी, कुठं, कशी पाहता येईल? वाचा एका क्लिकवर!

WhatsApp Group

IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२० सप्टेंबर) मोहालीत खेळवला जाणार आहे. पुढील महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक लक्षात घेता ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. आता टीम इंडियाकडून कोणत्याही प्रकारची चूक होण्यास वाव नसेल. ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मायदेशात मालिका खेळायची आहे. पण सध्या चाहत्यांच्या मनात नक्कीच प्रश्न असतील की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार आहे. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया…

कधी, कुठे होणार सामना?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-२० मालिकेतील हा पहिला सामना आज (२० सप्टेंबर) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे. या सामन्यातील नाणेफेक संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. त्याचा पहिला सामना मोहालीत होणार आहे. दुसरा सामना २३ सप्टेंबरला नागपुरात तर तिसरा टी-२० सामना २५ सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.

हेही वाचा – शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवायच्या आहेत? ‘हे’ ५ घरगुती उपाय करा आणि बघा!

कुठे पाहता येणार सामना?

भारत-ऑस्ट्रेलिया सामना स्टार नेटवर्कवर प्रसारित केला जात आहे, त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर थेट सामना पाहायला मिळेल. लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर होईल.

दोन्ही संघांमधील रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने १३ जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियानं ९ जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये ७ टी-२० सामने झाले. यामध्ये भारतानं ४ तर ऑस्ट्रेलियानं ३ सामने जिंकले.

मालिकेसाठी दोन्ही संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया संघ : आरोन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment