शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवायच्या आहेत? ‘हे’ 5 घरगुती उपाय करा आणि बघा!

WhatsApp Group

Remedies To Increase White Blood Cells : पांढऱ्या पेशी रक्तामध्ये उपस्थित असलेल्या पेशींचा एक प्रकार आहे. आपल्या शरीरातील या अशा पेशी आहेत, ज्या आपल्याला संसर्गजन्य रोग आणि बाह्य हानिकारक रोगांपासून संरक्षण करतात. त्यामुळे जर आपल्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशींची कमतरता असेल तर आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पांढऱ्या रक्त पेशी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही विविध आहाराचं पालन करू शकता. याशिवाय असे काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीनं पांढऱ्या रक्त पेशी वाढवता येतात. चला जाणून घ्या अशाच काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल…

पपईची पानं

पपईच्या पानांमध्ये एसिटोजेनिन्स असतात, जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्याचं काम करतात. यासोबतच ते तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवू शकतं. याशिवाय डेंग्यू तापावरही पपईची पानं फायदेशीर ठरू शकतात. शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी पपईची काही पाने घ्या. आता ही पाने नीट धुवून घ्या आणि ब्लेंडरच्या मदतीनं धुवा. त्यानंतर त्यात थोडं पाणी घालावं. त्यानंतर ते गाळून घ्या. आता हा रस नियमित प्या. चव बदलण्यासाठी तुम्ही त्यात मधही घालू शकता. यामुळं शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढू शकतात.

हेही वाचा – पेप्सीला ‘Pepsi’ का म्हणतात माहितीये? वाचा या फेमस सॉफ्ट ड्रिंकची कहाणी!

लसूण

शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरू शकते. यात इम्युनोमोड्युलेटरी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. याचं नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. याशिवाय तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये लसणाचा समावेश करू शकता. यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढू शकतात.

लॅव्हेंडर तेल

शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी लॅव्हेंडर तेल खूप प्रभावी ठरू शकतं. हे तेल तणाव आणि चिंता विकार कमी करण्यासाठी प्रभावी आहे. झोपेच्या समस्या दूर करण्यातही हे गुणकारी आहे. लॅव्हेंडर तेल वापरण्यासाठी, ६० मिली वाहक तेलात (बदाम तेल, खोबरेल तेल इ.) लॅव्हेंडर तेलाचे २० थेंब घाला. आता हे तेल चांगले मिसळा. आता या मिश्रणानं शरीराला नियमित मसाज केल्याने पांढऱ्या रक्त पेशी वाढू शकतात.

दह्याचं सेवन करा

दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. रक्तातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो. पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी तुमच्या आहारात १ वाटी दही नियमितपणे समाविष्ट करा. याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो.

सूर्यफूल बिया

फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी ६ सारखी अनेक पोषक तत्वे सूर्यफुलाच्या बियांमध्ये आढळतात, जी संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्हाला शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवायच्या असतील तर त्याचा नियमितपणे तुमच्या सॅलडमध्ये समावेश करा. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment