

IND vs AUS 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. शुक्रवारी (२३ सप्टेंबर) टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्यासाठी या मैदानावर उतरणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांना चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघानं हा सामना जिंकला नाही तर मालिका गमवावी लागेल. या मैदानावरील भारताचा विक्रम पाहता, गेल्या सहा वर्षांपासून भारत इथं हरलेला नाही.
टीम इंडिया पाचव्यांदा टी-२० सामना खेळण्यासाठी नागपुरात उतरणार आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी भारतानं इथं बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. हा सामना भारतानं ३० धावांनी जिंकला. नागपुरात आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघानं दोन विजय मिळवले आहेत. भारत इथं प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा – असा खासदार पाहिलाय का..? स्वत:च्या हातानं धुतलं टॉयलेट; VIDEO व्हायरल
Touchdown Nagpur 📍🧡#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/Odt7nFjlTe
— BCCI (@BCCI) September 21, 2022
या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. दुखापतीनंतर तो पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत तो दुसऱ्या सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज चांगलेच महागात पडले होते. लेगस्पिनर युझवेंद्र चहललाही विशेष कामगिरी करता आली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने किफायतशीर गोलंदाजी करताना ३ बळी घेतले.
हेही वाचा – २४ वर्षीय अभिनेत्यानं आपल्या आईलाच संपवलं..! मिळाली जन्मठेपेची शिक्षा
दोन्ही संघांची संभाव्य Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पxड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.