असा खासदार पाहिलाय का..? स्वत:च्या हातानं धुतलं टॉयलेट; VIDEO व्हायरल

WhatsApp Group

BJP MP Cleans Girls School Toilet : अनेकदा वादात सापडलेले रीवा लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या हातानं शौचालय (Toilet) साफ करताना दिसत आहे. खासदार मिश्रा रीवा जिल्ह्यातील खटखरी या मुलींच्या शाळेत गेले होते. शौचालय साफ करताना मिश्रा यांनी हातात ग्लोव्ह्जही घातले नाही आणि ब्रशचा वापरही केला नाही.

१७ सप्टेंबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते गांधी जयंती (२ ऑक्टोबर) पर्यंत भाजपचा पंधरवडा सुरू आहे. या भागात कन्याशाळेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास खासदार जनार्दन मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेला भेट दिल्यानंतर खासदारांनी मुलींचं स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचं पाहिलं, त्यामुळं त्यांनी ते स्वतः स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खासदारांनी केमिकल किंवा ब्रशचीही वाट पाहिली नाही. बादलीत पाणी घेतले आणि शौचालय साफ करायला सुरुवात केली. हाताने स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचा संदेश खासदारांनी दिला.

हेही वाचा – २४ वर्षीय अभिनेत्यानं आपल्या आईलाच संपवलं..! मिळाली जन्मठेपेची शिक्षा

जनार्दन मिश्रा म्हणाले, ”प्रत्येकाने स्वच्छता राखली पाहिजे. महात्मा गांधींपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्व स्वच्छतेचा संदेश देत आहेत. ही काही नवीन गोष्ट नाही. मी यापूर्वी शौचालये साफ केली आहेत.” याआधी खासदार जनार्दन मिश्रा यांनी हात रिक्षा चालवून घरोघरी जाऊन कचरा उचलला होता. ही घटना खूप गाजली होती. २०१४ मध्ये भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांना स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ते अनेकदा स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करतात. कोरोनाच्या काळात ते स्वतः शिलाई मशीनद्वारे मास्कचे वाटप करत होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment