IND vs BAN : विराट..तूच किंग रे! सहज SIX ठोकत साजरं केलं शतक; पाहा Video

WhatsApp Group

Virat Kohli Century : बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) चटगाव वनडेत टीम इंडियाच्या इशान किशनने द्विशतक ठोकलेच. पण ग्रँडमास्टर विराट कोहलीनेही खास अंदाजात शतक पूर्ण केले. ऑगस्ट २०१९ म्हणजेच ३ वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक केले. कोहलीने ९१ चेंडूत ११३ धावांची जबरदस्त खेळी केली. शतक पूर्ण केल्यानंतर चीकूच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.

विराटने १२४.१७ च्या स्ट्राईक रेटने ११३ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. दुसऱ्या टोकाला धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या इशान किशनने वनडेत द्विशतक पूर्ण केले, तेव्हा किंग कोहलीनेही गिअर बदलला आणि वेगाने धावा काढायला सुरुवात केली. विराट कोहलीची विकेट शाकिब अल हसनने घेतली.

हेही वाचा – IND Vs BAN : छोटा पॅकेट बडा धमाका..! इशान किशनची वादळी ‘डबल सेंच्युरी’; पाहा सेलिब्रेशन Video

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचे वनडे शतक केले होते, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्याने हे शतक झळकावले होते. तेव्हा कोहलीने ९९ चेंडूत नाबाद ११४ धावा केल्या आणि आपल्या नेतृत्वाखाली संघाला विजय मिळवून दिला. तेव्हापासून आजपर्यंत त्याने अनेक अर्धशतके ठोकली आहेत. तीन वेळा ८० च्या वर धावा केल्या, पण शतक पूर्ण करू शकला नव्हता.

रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावताच विराट कोहलीने रिकी पाँटिंगला मागे टाकले. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत पाँटिंगच्याही पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटचे हे ७२ वे शतक ठरले. या यादीत अग्रस्थानी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव आहे, ज्याने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १०० शतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विराट आहे, ज्याने ४८२ सामन्यांमध्ये ७२ शतके पूर्ण केली आहेत. रिकी पाँटिंग आता ५६० सामन्यांमध्ये ७१ आंतरराष्ट्रीय शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment