VIDEO : याला म्हणतात शेन वॉर्नसारखा स्पिन…! कुलदीप यादवने टाकलेला हा बॉल पाहाच

WhatsApp Group

IND vs ENG 5th Test | धरमशाला कसोटीत भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने इंग्लंड क्रिकेट संघाचा धुव्वा उडवला. एकट्याने अर्धशतक झळकावणाऱ्या जॅक क्रॉलीच्या महत्त्वाच्या विकेटचाही कुलदीपच्या खात्यात समावेश झाला. टीम इंडियाच्या पहिल्या 6 विकेट्सपैकी 5 विकेट्स कुलदीपच्या खात्यात होते. सलामीवीर जॅक क्रॉलीला त्याने बाद केले, तेव्हा महान फिरकीपटू शेन वॉर्नची आठवण झाली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. संघासाठी जॅक क्रॉलीने बेन डकेटसह पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. यानंतर कुलदीप यादवने हल्ला चढवला. यामध्ये जॅक क्रॉलीच्या मौल्यवान विकेटचाही समावेश होता.

हेही वाचा – IPL 2024 : आली रे आली…मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी आली!

कुलदीपने वॉर्नची आठवण करून दिली

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा चेंडू कधी फलंदाजासमोर, तर कधी पाठीमागून उडून स्टम्पवर आदळायचा, असेच काहीसे धरमशाला येथे पाहायला मिळाले. कुलदीप यादवने जॅक क्रॉलीकडे चेंडू टाकला जो ऑफवर पिच झाला आणि लगेचच सुमारे 10 अंश वळण घेत थेट स्टम्पवर गेला. धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात क्रॉलीने 108 चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारत 79 धावा केल्या. त्याच्याकडे शतक झळकावण्याची उत्तम संधी होती. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांत आटोपला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment