India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावर असलेली अनिश्चितता अखेर संपली आहे. भारत सरकारने एशिया कप 2025 अंतर्गत होणाऱ्या या बहुचर्चित सामन्याला मंजुरी दिली आहे. हा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
अलीकडेच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर चार दिवसांपर्यंत युद्धसदृश्य परिस्थिती होती. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र आता केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट भूमिका घेत, एशिया कपमधील हा सामना रोखला जाणार नसल्याचे जाहीर केलं आहे.
सरकारने स्पष्ट केलं: द्विपक्षीय नाही, पण मल्टीनॅशनल स्पर्धांमध्ये होईल सामना
PTI च्या अहवालानुसार, सरकारने स्पष्ट केलं आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिका (bilateral series) होणार नाही. परंतु मल्टीनॅशनल टूर्नामेंट जसे की एशिया कप, वर्ल्ड कप यामध्ये भारत-पाकिस्तान सामने खेळवले जातील.
हेही वाचा – घुसखोरांना झटका, नागरिकांना धक्का! आसाममध्ये प्रौढांसाठी आधार कार्ड बंद
भारताचे नवीन क्रीडा धोरण
क्रीडा मंत्रालयाने भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेऊन नवीन धोरण जाहीर केलं आहे. यानुसार:
- भारत कोणतीही मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही.
- पाकिस्तानलाही भारतात खेळण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.
- मात्र एशिया कपसारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये सामन्यांना हरकत नाही.
अन्य खेळांनाही लागू होईल ही पॉलिसी
ही क्रीडा धोरण फक्त क्रिकेटपुरती मर्यादित न राहता इतर सर्व खेळांनाही लागू होणार आहे. म्हणजेच:
- कोणताही पाकिस्तानी खेळाडू भारतात कोणत्याही स्पर्धेसाठी येऊ शकणार नाही.
- तसेच भारतीय खेळाडू पाकिस्तानात स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.
मात्र, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स जिथे दोन्ही संघांचा सहभाग अनिवार्य आहे, तिथे हे खेळाडू एकमेकांसमोर खेळू शकतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!