Amol Muzumdar Welcome : नवी मुंबईत रविवारी रात्री इतिहास रचला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच वनडे विश्वचषक जिंकत दक्षिण आफ्रिकेला डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर 52 धावांनी हरवत अमोघ कर्तृत्व सिद्ध केले. या अविस्मरणीय विजयाचा उत्सव देशभर साजरा होत असतानाच, संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार मुंबईत घरी परतताच शेजाऱ्यांनी अविस्मरणीय स्वागत केले.
मुंबईतील विले पार्ले येथे पोहोचताच मुझुमदार यांचे चाहते, शेजारी त्यांच्यासाठी घराबाहेर जमा झाले आणि त्यांना सन्मानाने गार्ड ऑफ ऑनर दिला. भारतीय संघातील प्रशिक्षकाला मिळालेला हा सन्मान पाहून स्वतः मुझुमदार देखील भारावून गेले. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
A warm welcome for a World Cup-winning coach!
— Sportstar (@sportstarweb) November 4, 2025
Amol Muzumdar received a guard of honour on his arrival at his residence in Mumbai after coaching the Indian women's cricket team to its maiden World Cup title.
📽️: PTI pic.twitter.com/DqyHkPBIcu
A grand welcome for India Women’s World Cup-winning coach Amol Muzumdar at his home in Vile Parle Mumbai.🥹🇮🇳❤️
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 3, 2025
He deserve all the respect and love.🫡❤️ pic.twitter.com/1y5d5JPDJa
हेही वाचा – एअर इंडिया दुर्घटनेतून बचावलेला ‘तो’ एकटाच जिवंत माणूस आज कसा जगतोय?
Huge welcome for Indian Coach Amol Muzumdar at his home town after winning the World Cup. ❤️@BCCI #IndianCricket pic.twitter.com/gv2rWKL12V
— Sahil Makol (@SahilMakol2) November 4, 2025
या विजयाबद्दल बोलताना, भावूक झालेल्या मुझुमदार यांनी सांगितले, “हे फक्त विजेतेपद नाही, हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. मुलींनी अविश्वसनीय मेहनत घेतली. हा क्षण अजूनही मनात बसत नाही. प्रत्येक खेळाडूने देशाचं नाव उंचावलं आहे.”
पराभवांचा काळ आठवताना त्यांनी पुढे सांगितले, “आम्ही कधीही पराभवांना पराभव मानलं नाही. काही चुका झाल्या, पण आत्मविश्वास कायम ठेवला. आज 2 नोव्हेंबर 2025, आपण जगज्जेते आहोत हा प्रवास अविस्मरणीय आहे.”
हा विजय फक्त खेळाडूंसाठी नव्हे तर भारतीय क्रिकेटमधील मेहनती आणि समर्पित प्रशिक्षकांसाठीही एक मोठा क्षण ठरला आहे. मुझुमदार यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींसाठी हा भावनिक क्षण अधिक अभिमानाचा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा