एअर इंडिया दुर्घटनेतून बचावलेला ‘तो’ एकटाच जिवंत माणूस आज कसा जगतोय?

WhatsApp Group

Air India Crash Lone Survivor : 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेत 241 जणांचा मृत्यू झाला. या हादऱ्यातून विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवासी जिवंत बाहेर पडले. आजही त्यांनी तो क्षण विसरलेला नाही, आणि त्यापेक्षा कठीण आहे ते वाचूनही तुटून जगणं.

लंडन-अहमदाबाद AI-171 विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळले तेव्हा, धुराने भरलेल्या अवशेषांमधून हळूहळू चालत बाहेर पडणारी एक आकृती दिसली, ती विश्वासकुमार रमेश यांची होती. पण ज्यानं मृत्यूला मागे टाकलं, त्याला आज जीवन जगणं सर्वात अवघड वाटतं.

“मी जिवंत राहिलो, हे आजही मला विश्वास बसत नाही. चमत्कार आहे. पण माझं आयुष्य उध्वस्त झालं आहे”, रमेश भावूक होऊन म्हणतात.

भाऊ गमावला, आयुष्य तुटलं

या अपघातात त्यांचा धाकटा भाऊ अजय रमेशचा मृत्यू झाला. काही सीटच्या अंतरावर बसलेला अजय पळूही शकला नाही.

“माझा भाऊ माझा आधार होता. आता मी रिकामा आहे.”

त्यांना PTSD ची निदान झालं असून मानसिक स्थिती गंभीर आहे. पत्नी-मुलगा घरात असूनही त्यांच्याशी बोलणं, भेटणं त्यांनी थांबवलं आहे. ते म्हणाले, “मी खोलीत एकटाच बसतो. कोणाशी बोलत नाही. रात्रीभर विचार आणि वेदना… प्रत्येक दिवस यातना आहे.”

आईही खचली, कुटुंबावर प्रचंड मानसिक ताण

दुर्घटनेनंतर त्यांची आईही खोल आघातात आहे. ती दररोज दारात बसून राहते, ना बोलते, ना काही करते.

शरीर जखमी, चालणंही अवघड

सीट 11A मधून धडाच्या फटीतून बाहेर पडताना त्यांना अनेक दुखापती झाल्या. पाय, खांदा, गुडघा आणि पाठदुखीमुळे ते काम करू शकत नाहीत. चालण्यासाठी पत्नीची मदत घ्यावी लागते.

हेही वाचा – VIDEO : जयपूरमध्ये डंपरचं मृत्यूतांडव..! 5 किमीपर्यंत 50 जणांना चिरडले; 18 ठार

व्यवसाय उद्ध्वस्त, आर्थिक संकट

दिऊ येथे त्यांच्या भावासोबत चालवलेला मासेमारी व्यवसायही कोसळला आहे. समुदाय नेते संजीव पटेल आणि रॅड सीगर यांनी मानसिक-आर्थिक मदतीअभावी नाराजी व्यक्त केली आहे.

एअर इंडिया ची भरपाई अपुरी

एअर इंडियाकडून त्यांना ₹25.09 लाख दिले गेले आहेत; मात्र कुटुंबानुसार ही मदत आवश्यक गरजांसाठी खूपच कमी आहे.
एअर इंडियाने कुटुंबाशी भेटीसाठी तयारी दाखवल्याचे कंपनीने सांगितले असले तरी, कुटुंबाच्या म्हणण्यानुसार मदतीची प्रक्रिया मंद व अपुरी आहे.

‘वाचलो, पण आयुष्य हरवलं’

“मी वाचलो आहे… पण आतून तुटलो आहे. जीवन आता एक लढाई आहे.” हे शब्द त्या माणसाचे आहेत, ज्याने मृत्यूवर मात केली, पण दुःखापुढे आजही लढत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment