VIDEO : जयपूरमध्ये डंपरचं मृत्यूतांडव..! 5 किमीपर्यंत 50 जणांना चिरडले; 18 ठार

WhatsApp Group

Jaipur Dumper Accident : राजस्थानच्या जयपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला आहे. हरमाडा पोलीस स्टेशन परिसरात एका अनियंत्रित डंपरने तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना आणि वाहनांना चिरडले. या हृदयद्रावक घटनेत 18 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, किमान 50 जण गंभीर जखमी आहेत. अनेक जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, डंपर इतक्या जोरात आणि अनियंत्रित अवस्थेत धावत होता की जे कुणी समोर आले, ते डंपरखाली चिरडले गेले. अपघातात एकापेक्षा अधिक वाहनांचा चक्काचूर झाला, तर काही लोकांचे शरीराचे अवयव तुकडे तुकडे झाल्याचे भीषण दृश्य लोकांनी पाहिले. अनेक किलोमीटरपर्यंत रक्त आणि मलबा रस्त्यावर पसरला होता.

डंपर चालक फरार

डंपर लोहा मंडीकडे जात होता, तेव्हा अचानक त्याचे नियंत्रण सुटले. जोरदार धडक देत डंपर पुढे धावत राहिला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला, ज्यामुळे स्थानिकांमध्ये आणखी संताप निर्माण झाला आहे.

प्रशासनाविरोधात आंदोलन

अपघातानंतर परिसरात गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांविरोधात संतप्त निदर्शने केली. त्यांचे म्हणणे आहे की,

  • रस्त्यावर मोठ्या वाहनांवर नियंत्रण नाही
  • वाहतूक नियमांची अंमलबजावणी नाही
  • चालक नशेत होता अशी शंका
  • ब्रेक फेल झाल्याची शक्यता

संतापलेल्या नागरिकांनी चक्‍का जाम करत तातडीने दोषी चालकाला पकडण्याची मागणी केली आहे.

बचावकार्य सुरू

इमरजन्सी टीम, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे आणि डंपर बेकाबू होण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू केले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment