IPL 2023 Final : आशिष नेहराने मोडला नियम! मोहित, राशिदला ट्रिपल सीट घेत…

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK Ashish Nehra : आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्सने गेल्या दोन मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली आयपीएल पदार्पण करणारा संघ गेल्या मोसमातच चॅम्पियन बनला होता. आणि या हंगामात संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. नेहराची खासियत म्हणजे तो खेळाडूंशी त्यांच्या जागेवर जाऊन बोलतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. तो खेळाडूंशी खूप जवळचा आहे. खेळाडू त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात.

याच नेहराचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आशिष नेहरा स्टेडियममध्ये स्कुटी चालवताना दिसत आहे. या स्कुटीवर मोहित शर्मा आणि राशिद खानही आहे. ही ट्रिपल राइड केवळ मनोरंजनासाठी करण्यात आली होती.

हेही वाचा – IPL 2023 Final : ओ माय गॉड….! CSK च्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती; आज शेवटची मॅच

राशिद खान आणि मोहित शर्मा नेहराच्या मागे बसले होते आणि नेहरा त्यांना मैदानात घेवून जात होता. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे. तर मोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमी या यादीत आघाडीवर आहे. गुजरातच्या यशात केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे यावरून दिसून येते.

IPL 2023 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. गुजरातचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. शुबमन गिल संघाकडून फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर गोलंदाजांची कामगिरीही अप्रतिम आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment