IPL 2023 : धोनी पुढच्या वर्षीही खेळणार..! टॉसवेळी काय घडलं? पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 MS Dhoni On His Last Season : आयपीएल 2023 मध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे महेंद्रसिंह धोनीची. धोनीचे चाहते स्टेडियममध्ये सतत त्याला निरोप देण्यासाठी फलक घेऊन येत आहेत. आता बुधवारी, जेव्हा धोनी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या (LSG vs CSK) सामन्यात नाणेफेकसाठी आला तेव्हा डॅनी मॉरिसनने त्याला गंमतीने विचारले की तो त्याच्या शेवटच्या आयपीएल हंगामाचा आनंद घेत आहे का? याला प्रत्युत्तर म्हणून धोनीने जे सांगितले ते काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

जेव्हा समालोचकाने धोनीला विचारले की तो त्याच्या शेवटच्या आयपीएल हंगामाचा आनंद घेत आहे का? याला उत्तर देताना तो म्हणाला, ”हा माझा शेवटचा सीझन आहे, असे तुम्ही ठरवले आहे, मी तसे ठरवलेले नाही.”

धोनीने असे म्हणताच स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी त्याच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. लखनऊमध्येही प्रेक्षक केवळ धोनीला पाठिंबा देण्यासाठीच पोहोचल्याचे दिसते. संपूर्ण मैदानात धोनी-धोनीचा आवाज येत आहे.

हेही वाचा – Cabinet Decision : दरवर्षी 25 जणांना शिष्यवृत्ती, कोल्हापुरात मनोरुग्णालय आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळ!

दोन्ही संघाची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, महेश तिक्ष्णा.

सबस्टीट्यूट : अंबाती रायुडू, सुभ्रांसू सेनापती, मिचेल सँटनर, शेख रशीद, आकाश सिंग.

लखनऊ सुपर जायंट्स : काइल मेयर्स, मनन वोहरा, करन शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान.

सबस्टीट्यूट : यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, प्रेरक मांकड, दीपक हुडा, क्विंटन डिकॉक.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment