IPL 2023 : चाहत्याने भर मैदानात विराट कोहलीचे धरले पाय..! पुढे काय झालं? पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 A Fan Touched Virat Kohli Feet : लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आयपीएल 2023 चा 43वा लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगतदार सामना रंगला. या सामन्यात दोन्ही संघांची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. बंगळूरूने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर फक्त 127 धावांचे लक्ष्य ठेवले. पण प्रत्युत्तरात लखनऊचा अर्धा संघ 38 धावांत गारद झाला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने आपल्या एका कृत्यामुळे सर्वांची मने जिंकली.

लखनऊची फलंदाजी सुरू असताना एक चाहता विराटकडे धावत आला. मैदानात येताच त्याने विराटचे पाय धरले आणि नमस्कार केला. विराटनेही चाहत्याचे मन न दुखावत त्याला अलिंगन दिले. विराटच्या या कृतीनंतर चाहताही भारावून गेला. विराटला भेटण्याचा पराकोटीचा आनंद या चाहत्याच्या तोंडावर दिसत होता.

हेही वाचा  – SBI ग्राहकांची चांदी..! पुन्हा सुरू झाली ‘ही’ तगडी स्कीम; 7.60 टक्क्याने मिळतं व्याज!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघाला 9 गडी गमावून केवळ 126 धावाच करता आल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने 44 धावांची खेळी केली. लखनऊकडून वेगवान गोलंदाज नवीन उल हकने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा यांना 2 बळी मिळाले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment