

IPL 2023 LSG vs RCB : आयपीएल 2023 मध्ये 43व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी फलंदाजीत सुमार कामगिरी केली. बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने ट़ॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संथ खेळपट्टीमुळे बंगळुरूला 20 षटकात 9 बाद 126 धावाच करता आल्या. डु प्लेसिसने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 31 धावा केल्या. लखनऊकडून वेगवान गोलंदाज नवीन उल हकने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा यांना 2 बळी मिळाले.
प्रत्युत्तरात लखनऊचीही सुरुवात अत्यंत खराब राहिली. दुखापतीमुळे केएल राहुल सलामी देऊ शकला नाही. काईल मेयर्स खाते न उघडता बाद झाला. दीपक हुडा, कृणाल पंड्या मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. लखनऊने अवघ्या 38 धावांत 5 विकेट्स गमावल्या. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्यामुळे कप्तान केएल राहुल अकराव्या क्रमांकाला फलंदाजीला आला. पण त्यालाही काही खास करता आले नाही. लखनऊला संघ 19.5 षटकात 108 धावांवर ऑलआऊट झाला. बंगळुरूकडून जोस हेझललवूड आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 बळी घेतले.
This is the brand of cricket we're known to play! 🔥
This is how we PLAY BOLD! 💪#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #LSGvRCB pic.twitter.com/syjB1Fd63R
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 1, 2023
हेही वाचा – IPL 2023 : चाहत्याने भर मैदानात विराट कोहलीचे धरले पाय..! पुढे काय झालं? पाहा Video
खेळाडूंमध्ये राडा!
लखनऊच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहलीचा आक्रमकपणा दिसून आला. सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याचे आणि लखनऊच्या नवीन उल हकमध्ये भांडणही झाले. सामन्यानंततर लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यातही वादावादी पाहायला मिळाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी या दोघांना वेगळे केले. सामना संथ खेळला गेला असला तरी, प्रेक्षकांना खेळाडूंमधील गरमागरमीची दृश्ये पाहायला मिळाली.
Full video! Thank me, later.#RCBVSLSG #LSGvsRCB #ViratKohli pic.twitter.com/jb0Qoq1bcm
— 𝐂𝐊 (@ChandraahTweets) May 1, 2023
Lol he is showing aggression to the king of cricket 😭😭#RCBVSLSG #ViratKohli𓃵 #IPL2023 pic.twitter.com/DF0Empuwi5
— Haider Khan 🇮🇳💚 (@ind_iw0) May 1, 2023
https://twitter.com/sexycricketshot/status/1653100844693491715
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), काईल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, यश ठाकूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कप्तान), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!