IPL 2023 : अर्शदीप सिंगचा मुंबईत कहर..! मोडले दोन मिडल स्टम्प; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Arshdeep Singh : मुंबईच्या वानखेडेवर चाहत्यांना आयपीएल 2023 चा थरारक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईचा (MI vs PBKS) 13 धावांनी पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. शेवच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. क्रीजवर होते फॉर्मात असलेला तिलक वर्मा आणि तुफानी अंदाजात फलंदाजी करणारा टिम डेविड.

मात्र अर्शदीपने या दोघांनाही आवर घालत षटकात फक्त दोन धावा देत विजय पंजाबच्या झोळीत टाकला. विशेष म्हणजे अर्शदीपने तिलक वर्मा आणि इम्पॅक्ट खेळाडू नेहल वधेरा यांना बोल्ड करत मिडल स्टम्पच मोडले. हे स्टम्प लावण्यासाठी नवे स्टम्प मागवण्यात आले. त्याची भन्नाट गोलंदाजी पाहून सर्वच थक्क झाले. आपण भारताचा प्रमुख गोलंदाज का आहे, हे अर्शदीपने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने दाखवून दिले.

हेही वाचा – IPL 2023 : एका ओव्हरमध्ये 31 रन्स..! अर्जुन तेंडुलकरचा ‘नवा’ रेकॉर्ड; 2 सिक्स, 4 चौकार आणि

असा रंगला सामना…

नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ८ बाद २१४ धावा ठोकल्या. पंजाबकडून हरप्रीत सिंगने 41 धावा (4 चौकार, 2 षटकार), सॅम करनने 55 धावा (5 चौकार, 4 षटकार), जितेश शर्माने 25 धावा (4 षटकार) केल्या. मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरने एका षटकात 31 धावा देण्याचा विक्रमही केला. प्रत्युत्तरात मुंबईकडून रोहित शर्माने 44 धावा (4 चौकार, 3 षटकार), कॅमेरून ग्रीनने 67 धावा (6 चौकार, 3 षटकार), सूर्यकुमार यादवने 57 धावा (7 चौकार, 3 षटकार), टिम डेव्हिडने 25 धावांचे (2 षटकार) योगदान दिले. अर्शदीपने 29 धावांत 4 बळी घेतले. मुंबईला 20 षटकात 6 बाद 201 धावांपर्यंत पोहोचता आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment