IPL 2023 RR vs GT : गुजरातसमोर राजस्थानचा पालापाचोळा..! राशिद, नूरसमोर ढेपाळले ‘रॉयल्स’

WhatsApp Group

IPL 2023 RR vs GT : आयपीएल 2023 स्पर्धेत जयपूरमध्ये रंगलेल्या लीगच्या 49व्या सामन्यात बलाढ्य गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 9 गड्यांनी सहज पराभव केला. मागील सामन्यात छोट्या आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयशी ठरलेल्या गुजरातने आज जबरदस्त खेळ केला. राशिद खान, नूर अहमद या अफगाण खेळाडूंनी आपल्या फिरकीत राजस्थानच्या फलंदाजांना गुंडाळले. 17.5 षटकात राजस्थानचा संघ 118 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात गुजरातने 13.5 षटकातच हा सामना खिशात टाकला.

या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर जोस बटलर (8) पुन्हा अपयशी ठरला. तर यशस्वी जयस्वाल (14) धावबाद झाला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या संजूला जोशुआ लिटलने झेलबाद केले. संजूने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. त्यानंतर पाठोपाठ सर्वच फलंदाजांनी निराशा केली. गुजरातकडून राशिद खानने फक्त 14 धावांत 3 विकेट्स घेतल्या. नूर अहमदला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – IPL 2023 CSK Vs MI : दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये..! मुंबई इंडियन्सचा ‘हा’ Video पाहिला का?

सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून वृद्धिमान साहा (नाबाद 41) आणि शुबमन गिल (36) यांनी 71 धावांची सलामी दिली. युझवेंद्र चहलने गिलला तंबूत पाठवले, पण तोपर्यंच उशीर झाला होता. कप्तान हार्दिक पांड्याने 15 धावांत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 39 धावांची झटपट खेळी केली. गुजरात संघ गुणतालिकेत 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला असून त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के झाले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment