IPL 2023 SRH vs KKR Aiden Markram Catch : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 47 वा लीग सामना खेळला गेला. केकेआरने हा सामना पाच धावांनी जिंकला. मात्र, एकेकाळी हैदराबाद हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही अप्रतिम खेळ दाखवला. आपल्याच गोलंदाजीत कोलकाता संघाचा कर्णधार नितीश राणाला उत्कृष्ट झेल टिपून पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम मार्करमने केले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोलकाता संघाची सुरुवात चांगली झाली नाही. केकेआरने केवळ 35 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर रिंकू सिंगसह नितीश राणाने डाव सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना केकेआरचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.
Just something about Proteas and 👌🏻 fielding efforts… @AidzMarkram's 💥 catch sends the #KKR skipper packing 🔙#IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/bAn65remH3
— JioCinema (@JioCinema) May 4, 2023
हेही वाचा – IPL 2023 SRH Vs KKR : जिंकता जिंकता हैदराबाद हरली..! कॅप्टन मार्करमला ‘ती’ चूक नडली
ही धोकादायक भागीदारी मोडण्याची जबाबदारी मार्करमने घेतली आणि त्याने डावाच्या 12व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नितीश राणाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्करमच्या या चेंडूवर राणाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत उंच गेला. हा झेल पकडण्यासाठी मार्करम पाठीमागे धावला आणि हवेत डाय टाकत त्याने हा झेल पकडला.
श्रेयस अय्यर अनफिट झाल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने नितीश राणाला संपूर्ण हंगामासाठी त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले. यानंतर राणा बॅटने ही जबाबदारी चोख बजावताना दिसेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, आत्तापर्यंत केकेआरची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. राणाने या मोसमात 10 सामन्यात बॅटने 27.50 च्या सरासरीने केवळ 275 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये केवळ 1 अर्धशतक खेळीचा समावेश आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!