IPL 2024 CSK vs GT : 4,4,4,4,4,4,6,6,6…रचिन रवींद्रने गुजरातला फोडलं, पाहा टॉप शॉट्स!

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs GT Rachin Ravindra : सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील सातवा सामना आज खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळी शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या दोन नवीन कर्णधारांच्या नेतृत्व क्षमतेचीही चाचणी घेतली जाईल. शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या दोन्ही सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. यात रचिन रवींद्रची खेळी विशेष ठरली.

सुरुवातीला थोडे शांत राहिल्यानंतर रचिनने गुजरातचा समाचार घ्यायला सुरुवात केली. रचिनने 20 चेंडूत 46 धावांची वेगवान खेळी केली. आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 230 चा होता. रचिनला राशिद खानने बाद केले. ऋतुराज-रचिन जोडीने पहिल्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. रचिनची खेळी पाहून चाहत्यांनी त्याला चेन्नईचे भविष्य म्हटले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास, गुजरात टायटन्सचा हात वरचा आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. यात गुजरात टायटन्सने 3 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर चेन्नईच्या खात्यात 2 विजय आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कप्तान), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेविड मिलर, अजमतुल्लाह ओमरजई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर, मोहित शर्मा, स्पेंसर जॉनसन.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment