

IPL 2024 CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात चेपॉकवर सामना रंगत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईला 138 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. अनेक घातक फलंदाजांची भरणा असलेला केकेआर संघ चेन्नईसमोर फलंदाजीत अपयशी ठरला. खेळपट्टीची उसळी पाहता रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी केकेआरला जखडून ठेवले.
दोघांनाही 3-3 विकेच्स मिळाल्या. मुस्तफिजुरने दोन विकेट्स काढल्या. केकेआरकडून कप्तान श्रेयस अय्यरने सर्वाधिक पण संथ खेळी केली. आंद्र रसेल (10) आणि रिंकू सिंह (9) जास्त काही करू शकले नाहीत. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 34, सुनील नरिनने 27 आणि अंगक्रिश रघुवंशीने 24 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठ्या धावा करता आल्या नाहीत.
हेही वाचा – 20 मे रोजी शेअर बाजार बंद, BSE आणि NSE कडून घोषणा
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महिश थिक्षना
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरिन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा