IPL 2024 CSK vs LSG : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स रंगत आहे. चेपॉक स्टेडियम होणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतून रचिन रवींद्रला बाहेर करण्यात आले असून डॅरिल मिचेलला संधी दिली आहे. लखनौकडून घरच्या मैदानावर पराभूत झाल्यानंतर चेन्नईला घरच्या मैदानावर बदला घेण्याची संधी असेल. चेन्नईला गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये राहायचे असेल तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्याचबरोबर या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी बरेच काही पणाला लागणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव केला होता. मात्र, लखनऊला घरच्या मैदानावर पराभूत करण्याची चेन्नईकडे सुवर्णसंधी आहे. सध्या सुरू असलेल्या मोसमात चेन्नईचा संघ घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळे लखनऊसमोर चेन्नईला पराभूत करण्याचे आव्हान असेल.
हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता! IMD चा इशारा, वाचा कोकणात काय होणार
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड(कप्तान), डॅरिल मिचेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिषा पथिराना.
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, कल राहुल (विकेटकीपर/कप्तान), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा