IPL 2024 CSK vs PBKS : आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळला जात आहे. चेपॉक स्टेडियमवरील या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शिखर धवन अद्याप तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी सॅम करन पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही.
चेन्नई संघाचे दोन खेळाडू आजारी, शार्दुलला संधी
तर चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपल्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. मथिशा पाथिराना आणि तुषार देशपांडे यांची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे. शार्दुल ठाकूर प्लेइंग-11 मध्ये परतला आहे. चेन्नईने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराजच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 9 पैकी 3 सामने जिंकले असून ते 9व्या क्रमांकावर आहेत.
हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंज Binance च्या मालकाला तुरुंगवास!
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड गिल्सन आणि मुस्तफिजुर रहमान.
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रॉसो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा