IPL 2024 CSK vs RCB : ऋतुराज नावाला कॅप्टन, मैदानात धोनीच लावतोय फिल्डिंग! चेन्नईला 174 धावांचे आव्हान

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs RCB : यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. चेपॉक स्टेडियमवरील या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कप्तान फाफ डू प्लेसिसची चांगली सलामी आणि मधल्या फळीत अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या भागीदारीमुळे आरसीबीने सीएसकेला 174 धावांचे आव्हान दिले आहे. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सीएसकेसाठी सर्वाधिक 4 विकेट्स काढल्या. चेन्नईची कॅप्टन्सी ऋतुराज गायकवाडकडे आहे, पण मैदानात त्याला धोनीची मदत मिळाली. क्षेत्ररक्षणातील अनेक बदल धोनीने केली.

आरसीबीचा डाव

कप्तान फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी 41 धावांची सलामी दिली. फाफने 8 चौकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर मुस्तफिजुरने जबरदस्त स्पेल टाकला. यात त्याने फाफसह, रजत पाटीदार (0), ग्लेन मॅक्सवेल (0) विराट कोहली (21) आणि कॅमेरुन ग्रीन (18) यांना बाद केले. अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी आरसीबीची कमान सांभाळली. दोघांनी 95 धावांची भागीदारी केली. रावतने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 48 तर कार्तिकने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या. आरसीबीने 20 षटकात 6 बाद 173 धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2024 CSK Vs RCB : रहाणे 3.0…! रचिनसोबत ‘रिले’ कॅच, विराट कोहलीचा खेळ खल्लास, पाहा Video

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment