IPL 2024 DC vs GT : आयपीएल 2024 च्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा चार धावांनी पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत नाबाद 88 तर अक्षर पटेलने 66 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 220 धावाच करू शकला. राशिद खानने पराभव टाळण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 19 धावांची गरज होती. राशिदला मुकेश कुमारच्या या षटकात 14 धावा टोलवता आल्या.
गुजरातकडून साई सुदर्शनने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 65 धावांची खेळी केली. साई बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावा ठोकल्या. गुजरातच्या शेपटाकडच्या फलंदाजांमध्ये साई किशोरने 13 धावा केल्या. तर राशिदने नाबाद 21 धावा केल्या. दिल्लीकडून रसिख दार सलामने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – षटकारांची हॅट्ट्रिक, 1 षटकात 31 धावा, ऋषभ पंतने सर्वात धोकादायक गोलंदाजाला कुटले!
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कप्तान आणि विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलील अहमद, मुकेश कुमार.
गुजरात टायटन्स – ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कप्तान), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा