IPL 2024 DC vs MI : आज आयपीएल 2024 चा 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 257 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. जॅक फ्रेझर मॅकगर्कने डावाच्या सुरुवातीला चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याने पोरेलसोबत पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. यानंतर स्टब्स आणि पंतही मागे राहिले नाहीत. दोघांमध्ये 55 धावांची भागीदारी झाली.
मॅकगर्कने 27 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावा फटकावल्या. अभिषेक पोरेलने 36, शाई होपने 41, कप्तान ऋषभ पंतने 29 आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 48 धावा केल्या.
हेही वाचा – जसप्रीत बुमराहने टाकले सर्वात महागडे षटक, कारण जेक फ्रेझर-मॅकगर्क!
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाय होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कप्तान), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, ल्यूक वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा