IPL 2024 DC vs MI : हार्दिक पांड्याने जिंकला टॉस! दिल्लीचा मुंबईकर खेळाडू बाहेर, वाचा Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 DC vs MI : आज आयपीएलमध्ये दुपारी मोठा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगत आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे घर असलेल्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होत आहे. दोन्ही संघांमधील हा दुसऱ्या टप्प्यातील सामना आहे. याआधी, मुंबई इंडियन्सने दिल्लीवर विजय मिळवला होता. आता दिल्ली संघाला आज घरच्या मैदानावर परतफेड करायला आवडेल. मुंबई संघात जेराल्ड कोएत्झीऐवजी ल्यूक वूड खेळत आहे. तर दिल्लीत पृथ्वी शॉऐवजी कुशाग्रला संधी मिळाली आहे.

आयपीएलच्या इतिहासातील या दोन संघांच्या हेड-टू-हेडच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या सोळा वर्षांत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 34 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने 19 वेळा विजय मिळवला आहे, तर दिल्ली संघाने 15 वेळा सामना जिंकण्यात यश मिळविले आहे. दिल्लीच्या मैदानावर या दोन संघांमध्ये झालेल्या दहा सामन्यांमध्ये यजमान दिल्ली कॅपिटल्सने सहा वेळा विजय मिळवला आणि मुंबई संघाने चार सामने जिंकले.

हेही वाचा – FD Vs NSC : 5 वर्षांची एफडी की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट; 2 लाखांच्या गुंतवणूकीवर जास्त फायदा कुठे?

दोन्ही संघांची Playing 11

दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाय होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कप्तान), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, ल्यूक वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment