IPL 2024 DC vs RR : आज आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने राजस्थानला 222 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीने 20 षटकात 8 बाद 221 धावा केल्या. मॅकगर्कने 20 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 50 तर पोरेलने 7 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्सने 20 चेंडूत 41 धावा करत संघाला दोनशेपार पोहोचवले. राजस्थानकडून रवी अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नैब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा