IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्ससमोर 266 धावांचा डोंगर!

WhatsApp Group

IPL 2024 DC vs SRH : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा जबरदस्त धमाका केला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या. दिल्लीला दिल्लीतच गाडण्याचे ध्येय समोर ठेवत हैदराबादने फलंदाजी केली. हैदराबादचे धोकादायक सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या 6 षटकामध्ये बिनबाद 125 धावा केल्या. दोघांनी दे-दणादण फटकेबाजी केली. हेडने 16 चेंडूत अर्धशतक साकारले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने खलील अहमद, एनरिक नॉर्किया, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार हे गोलंदाज वापरले, पण हेड-अभिषेक जोडी थांबली नाही. या दोघांनी 6.2 षटकात 131 धावांची सलामी दिली. अभिषेकने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 46 धावा केल्या. तर हेडने 11 चौकार आणि 6 षटकारांसह 89 धावा केल्या. कुलदीप यादवने दोघांना बाद केले. त्यानंतर एडन मार्कराम (1) आणि हेनरिच क्लासेन (15) यांना लवकर बाद करण्यात दिल्लीने यश मिळवले. पण त्यानंतर नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमद यांनी दमदार फलंदाजी करत धावा केल्या. नितीशने 37 धावा केल्या. तर शाहबाजने 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 59 धावांची खेळी केली. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स काढल्या.

हेही वाचा – खुद्द गौतम गंभीरने केलं कौतुक! म्हणाला, “तो टी-20 क्रिकेटचा दिग्गज खेळाडू…”

आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार

  • 22 – SRH vs RCB, Bengaluru, 2024
  • 22 – SRH vs DC, Delhi, today*
  • 21 – RCB vs PWI, Bengaluru, 2013
  • 20 – RCB vs GL, Bengaluru, 2016
  • 20 – DC vs GL, Delhi, 2017
  • 20 – MI vs SRH, Hyderabad, 2024

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या

  • 287/3 – SRH vs RCB Bengaluru 2024
  • 277/3 – SRH vs MI Hyderabad 2024
  • 272/7 – KKR vs DC Vizag 2024
  • 266/7 – SRH vs DC, Delhi, today*
  • 263/5 – RCB vs PWI Bengaluru 2013

फ्रँचायझी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 250+ स्कोअर

  • 3 – Surrey
  • 3 – SRH*
  • 2 – Somerset
  • 2 – Yorkshire
  • 2 – RCB

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment