हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा 22 वर्षाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क आहे तरी कोण?

WhatsApp Group

IPL 2024 DC vs SRH Jake Fraser-McGurk : 22 वर्षीय युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी स्फोटक खेळी खेळली आहे. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्याच षटकात मॅकगर्क फलंदाजीसाठी क्रिजवर आला. येताच तो गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने सर्वप्रथम वॉशिंग्टन सुंदरला लक्ष्य केले. मॅकगर्कने फक्त 15 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 18 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांसह 65 धावांची खेळी केली.

जेक फ्रेझर-मॅकगर्कने वॉशिंग्टन सुंदरच्या एकाच षटकात 30 धावा ठोकल्या. दिल्लीच्या डावातील तिसऱ्या षटकात त्याने पहिले दोन चेंडू लाँग ऑफच्या दिशेने चौकार मारले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑफला षटकार मारला. चौथा चेंडूही जेक फ्रेझर-मॅकगर्कने चौकार मारून पाठवला. त्याने ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला. दोन्ही षटकार लाँग ऑफ बाऊंड्री लाइनच्या बाहेर गेले.

मॅकगर्क ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळला आहे. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, आतापर्यंत तो फक्त 2 वनडे खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 51 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 41 आहे.

हेही वाचा – IPL 2024 DC Vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्ससमोर 266 धावांचा डोंगर!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, मॅकगर्कने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी, 21 लिस्ट ए आणि 38 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 30 प्रथम श्रेणी डावांमध्ये 550 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय त्याने लिस्ट-ए च्या 18 डावांमध्ये 32.81 च्या सरासरीने आणि 143.83 च्या स्ट्राईक रेटने 525 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले. T20 च्या 36 डावात फलंदाजी करताना फ्रेझरने 135.13 च्या स्ट्राइक रेटने 700 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment