6 ओव्हरमध्ये 125 धावा…., सनरायझर्स हैदराबादच्या ओपनर्सचा ‘पॉवरफुल’ विक्रम!

WhatsApp Group

IPL 2024 DC vs SRH Sunrisers Hyderabad : यंदाच्या आयपीएल हंगामात तुफान फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादने अजून एक मोठा विक्रम केला आहे. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्या 6 षटकामध्ये बिनबाद 125 धावा केल्या. हैदराबादचे धोकादायक सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दे-दणादण फटकेबाजी केली. हेडने 16 चेंडूत अर्धशतकाचा विक्रम केला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने खलील अहमद, एनरिक नॉर्किया, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार हे गोलंदाज वापरले, पण हेड-अभिषेक जोडी थांबली नाही. या दोघांनी 6.2 षटकात 131 धावांची सलामी दिली. अभिषेकने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 46 धावा केल्या. तर हेडने 11 चौकार आणि 6 षटकारांसह 89 धावा केल्या. कुलदीप यादवने दोघांना बाद केले.

हेही वाचा – खुद्द गौतम गंभीरने केलं कौतुक! म्हणाला, “तो टी-20 क्रिकेटचा दिग्गज खेळाडू…”

आयपीएलमधील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर

  • 125/0 – SRH vs DC, 2024*
  • 105/0 – KKR vs RCB, 2017
  • 100/2 – CSK vs PBKS, 2014
  • 90/0 – CSK vs MI, 2015
  • 88/1 – KKR vs DC, 2024*

आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान सांघिक शतक

  • 5 overs – SRH vs DC, Delhi, आज*
  • 6 overs – CSK vs PBKS, Mumbai WS, 2014
  • 6 overs – KKR vs RCB, Bengaluru, 2017
  • 6.5 overs – CSK vs MI, Mumbai WS, 2015
  • 7 overs – SRH vs MI, Hyderabad, 2024

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment