IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ‘बंपर’ विजय, दिल्लीला दिल्लीत चारली धूळ!

WhatsApp Group

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 मधील झंझावाती प्रवास कायम राखला आहे. दिल्लीत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या दिल्लीसमोर हैदराबादने 266 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 89, शाहबाज अहमदने 59, अभिषेक शर्माने 46 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीकडूनही जेक फ्रेजर मॅकगर्कने 18 चेंडूत 65 धावांची वादळी खेळी केली. अभिषेक पोरेलनेही 42 धावांचे योगदान दिले. दिल्लीचा संघ 199 धावांवर ऑलआऊट झाला.

दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (1) अपयशी ठरला. पृथ्वी शॉही (16) मोठी खेळी करू शकला नाही. ऋषभ पंतने 44 धावा केल्या, पण त्याला वेगवान खेळी करता आली नाही. हैदराबादकडून टी. नटराजनने 19 धावांत 4 विकेट्स काढल्या. नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडे यांना 2-2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा 22 वर्षाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क आहे तरी कोण?

हैदरराबादच्या पॉवरप्लेमध्ये 125 धावा

तत्पूर्वी, पॉवरप्लेमध्ये दिल्लीने खलील अहमद, एनरिक नॉर्किया, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार हे गोलंदाज वापरले, पण हेड-अभिषेक जोडी थांबली नाही. या दोघांनी 6.2 षटकात 131 धावांची सलामी दिली. अभिषेकने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 46 धावा केल्या. तर हेडने 11 चौकार आणि 6 षटकारांसह 89 धावा केल्या. कुलदीप यादवने दोघांना बाद केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment