

IPL 2024 : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा बदल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने काल त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव केला होता. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. स्फोटक अष्टपैलू मिचेल मार्श दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यांच्या बदलीची घोषणाही करण्यात आली आहे. आयपीएलने मीडिया ॲडव्हायजरी जारी करून ही माहिती दिली आहे.
आयपीएलने मीडिया ॲडव्हायझरी जारी केली आणि लिहिले, ‘टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या उर्वरित सामन्यांसाठी दिल्ली कॅपिटल्सने मिचेल मार्शच्या जागी अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू गुलबदीन नैबला करारबद्ध केले आहे. मार्श दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. नैबने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानसाठी 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले गेले आहेत. गुलबदीन नैबचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असेल. नैबला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात सामील केले आहे.
हेही वाचा – VIDEO : 6,6,6,6,…रजत पाटीदारची अफलातून हिटींग! एका ओव्हरमध्ये 4 षटकार, 19 चेंडूत अर्धशतक!
गुलबदीन नैब अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. आपल्या 71 डावात 1231 धावा करण्यात यशस्वी झाला आहे, तर 73 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना त्याने 82 मॅचमध्ये 802 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 26 विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सची पुढील सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा