

IPL 2024 KKR Pacer Harshit Rana : कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला पुन्हा एकदा शिस्तभंगाचा फटका बसला आहे. यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलची आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. यासाठी हर्षित राणाची मॅच फी 100 टक्के कापण्यात आली आहे. केकेआरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकला. यात हर्षितने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती.
या सामन्यात त्याने दिल्लीचा फलंदाज अभिषेक पोरेलला बाद केल्यानंतर ‘सेंड ऑफ’ दिला. तो फ्लाइंग किस्सही देत होता, पण नंतर त्याचा विचार बदलला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
हेही वाचा – VIDEO : सर्वात छोटा देश, फक्त 35 लोक आणि 4 कुत्रे, सिक्युरिटीशिवाय फिरतात राष्ट्रपती!
या सामन्यात हर्षितने चार षटकात केवळ 28 धावा देत दोन बळी घेतले. दिल्लीच्या डावातील सातवे षटक टाकताना त्याने अभिषेक पोरेलची विकेट घेतली. यानंतर त्यानेही हात हलवत इशारा केला. त्यामुळे हर्षितवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएलची आचारसंहिता मोडल्याप्रकरणी हर्षित राणा दोषी ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याने असेच कृत्य केले होते. मग मयंकचा झेल घेतल्यानंतर तो फलंदाजाच्या अगदी समोर गेला आणि फ्लाइंग किस दिला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा