IPL 2024 KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्सला खराब बॅटिंगचा फटका, केकेआरचा सहज विजय!

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs DC : आज आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 7 विकेट्सने सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सलामीवीर फिल सॉल्टने 7 चौकार आणि 5 षटकारांसह 68 धावा केल्या. श्रेयस अय्यर 33 तर व्यंकटेश अय्यर 26 धावांवर नाबाद राहिले. 16.3 षटकात केकेआरने हा सामना खिशात घातला.

दिल्लीने कोलकाताविरुद्ध 20 षटकांत नऊ गडी गमावून 153 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी या सामन्यात संघर्ष करताना दिसली. पॉवरप्लेमध्ये संघाने तीन गडी गमावले. शॉ 13 धावा केल्यानंतर, मॅकगर्क 12 धावा करून आणि होप 6 धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात दिल्लीने चौथी विकेटही गमावली. हर्षित राणाने अभिषेक पोरेलला बाद केले. त्याला 15 चेंडूत केवळ 18 धावा करता आल्या. यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये 25 धावांची भागीदारी झाली जी वरुण चक्रवर्तीने मोडली. त्याने कर्णधार ऋषभ पंतला बाद केले. तो 20 चेंडूत 27 धावा करून परतला.

हेही वाचा – मुंबई इंडियन्स, जरा सांभाळून….मयंक यादवने पास केली फिटनेस टेस्ट!

यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रिस्टन स्टब्स जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. अवघ्या चार धावा करून तो बाद झाला. या सामन्यात अक्षर पटेलने 35 धावा, कुमार कुशाग्राने एक धाव, रसिक सलामने आठ धावा, कुलदीप यादवने 35 धावा केल्या. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने तीन तर वैभव आणि हर्षीने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment