

IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 : टेबल टॉपर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये रंगत आहे. मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती यांची भेदक गोलंदाजी आणि त्यांना इतर गोलंदाजांनी दिलेली साथ सनरायझर्स हैदराबादला मारक ठरली. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगसाठी उतरलेल्या हैदराबादला केकेआरसमोर 159 धावाच करता आल्या. पॉवरप्लेमध्ये मिचेल स्टार्कने आग ओकणारी गोलंदाजी करत हैदराबादला धक्क्यावर धक्के दिले. तर हैदराबादच्या कप्तान पॅट कमिन्सने 30 धावा करत संघाला दीडशेपार पोहोचवले.
हैदराबाद 159 रन्सवर ऑलआऊट!
मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला ट्रॅव्हिस हेड (0), अष्टपैलू खेळा़डू नितीश रेड्डी (9) आणि शाहबाज अहमद (0) यांना स्टार्कने तंबूचा मार्ग दाखवला. अभिषेक शर्मा वैभव अरोराचा बळी ठरला, त्याला तीनच धावा करता आल्या. संघाचा डाव सांभाळत राहुल त्रिपाठीने 7 चौकार आणि एका षटकारासह 55 धावांची खेळी केली. पण अब्दुल समदच्या चुकीमुळे तो धावबाद झाला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या हेनरिक क्लासेनला वरुण चक्रवर्तीने बाद केले. क्लासेनने 32 धावांची खेळी केली. कप्तान पॅट कमिन्सने शेपटाकडे चांगली फलंदाजी करत 2 चौकार आणि 2 षटसारांसह 30 धावांचे योगदान दिले. हैदराबादचा डाव 19.3 षटकात 159 धावांवर संपुष्टात आला. मिचेल स्टार्कने 34 धावांत 3 विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्तीने 2 विकेट्स काढल्या. वैभव अरोरा, सुनील नरिन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Andre Russell gets the final breakthrough 💜
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
A handy knock from Captain Cummins comes to an end ☝️
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/0D4bg4K6RQ
हेही वाचा – VIDEO : ‘बिग मॅच प्लेअर’ मिचेल स्टार्कने सनरायझर्स हैदराबादची उडवली दाणादाण!
See the chance, take the chance…that's how Dre Russ does it🎯pic.twitter.com/i5fbIT5WiQ
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 21, 2024
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा