

IPL 2024 LSG vs MI : आज आयपीएलचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. एलएसजीने नाणेफेक जिंकून एमआयला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इशान किशन (32), नेहल वढेरा (46) आणि टीम डेव्हिड (35) यांच्या योगदानामुळे मुंबईला 20 षटकात 7 बाद 144 धावांपर्यंत पोहोचता आले. लखऊकडून मोहसिन खानने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या. मयंक यादवनेही एक विकेट घेत कमबॅक केले, पण चौथे षटक टाकण्यात अपयशी ठरला. त्याचे षटक नवीन उल हकने पूर्ण केले.
बर्थडे बॉय रोहित शर्मा फक्त 4 धावा करू शकला. कर्णधार हार्दिक पांड्याचे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तिलक वर्मा 7 धावा, सूर्यकुमार यादव 10 धावा काढून बाद झाले. लखनऊ आणि मुंबई चालू मोसमात प्रथमच भिडत आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. एलएसजीला गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. एलएसजीने आतापर्यंत नऊ पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा – केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर एका सामन्याची बंदी!
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा