“आर्मीतल्या बाबांसाठी सॅल्युट…”, ध्रुव जुरेलचे खास अर्धशतक; राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये!

WhatsApp Group

IPL 2024 LSG vs RR : आयपीएल 2024 मध्ये, राजस्थान रॉयल्सने अजून एक विजय आपल्या नावावर केला आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या संध्याकाळच्या सामन्यात राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गड्यांनी नेत्रदीपक विजय नोंदवला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या 76 धावांच्या जोरावर 5 विकेट्सवर 196 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाबाद अर्धशतक झळकावत 19व्या षटकात 3 गडी गमावून विजय मिळवला. सॅमसनने 7 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. या विजयासह राजस्थानने प्लेऑफचे तिकीट निश्चित केले आहे. सॅमसनसोबत ध्रुव जुरेलने नाबाद अर्धशतक ठोकले.

ध्रुवचे हे पहिले आयपीएल अर्धशतक ठरले. त्याने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावा केल्या. या अर्धशतकानंतर त्याने सॅल्युट केले. सामन्यानंतर ध्रुवला याबाबत विचारले असता तो म्हणाला, ”हे सॅल्युट माझ्या वडिलांसाठी होते, ते आर्मीचे जवान होते म्हणून मी त्यांना सॅल्युट केले. आज ते मला स्टँड्समध्ये बसून पाहत होते.”

ध्रुवचे बाबा नेम सिंह जुरेल हे कारगिलचे हिरो ठरले होते. जुरेल हे 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात सहभागी झाले होते. वडिलांना पाहून ध्रुवलाही भारतीय आर्मीमध्ये जायचे होते. पण त्याला क्रिकेटचे जास्त वेड होते. ध्रुव हा 2020 साली भारताच्या 19 वर्षांखालील संघात होता.

हेही वाचा – जर तुम्ही फ्लॅट किंवा घर खरेदी करणार असाल, तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा!

लखनऊने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा राजस्थान रॉयल्स संघाने दमदारपणे पाठलाग केला. कर्णधार संजू सॅमसन आणि युवा ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाने हे काम सोपे झाले. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. बटलर 34 धावा करून बाद झाला तर यशस्वी 24 धावा करून बाद झाला. रियान परागने 14 धावांवर विकेट गमावली. सॅमसनने ध्रुव जुरेलसोबत संघाला विजयापर्यंत नेले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment