

IPL 2024 : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या एका सामन्यात फलंदाज रोहित शर्माच्या विकेटवरून महाराष्ट्रात मोठी घटना घडली आहे. या वादातून हल्ला झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापुरात ही घटना घडली. येथे 63 वर्षीय शेतकरी बंडोपंत तिबिले आणि 50 वर्षीय बळवंत झांजगे हे मित्राच्या घरी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामना पाहत होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सामन्यादरम्यान रोहित शर्माची विकेट पडताच तिबिले आणि झांजगे यांच्यात सेलिब्रेशनवरून भांडण झाले.
विकेट पडल्यानंतर तिबिलेने केलेल्या कमेंटमुळे रोहितचे फॅन झांजगे संतापले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यादरम्यान झांजगे हे घटनास्थळावरून निघून गेले, मात्र नंतर नातेवाईक सागरला आणून तिबिले यांना बेदम मारहाण केली. यानंतर तिबिले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिबिले यांचा शनिवारी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा – IPL 2024 MI Vs RR : हार्दिक पांड्या वानखेडेवर Boooo…! मुंबईची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11
तिबिले आणि झांजगे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील हणमंतवाडी गावात सामना पाहत होते. या अहवालात पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुरुवातीला दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आता त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 म्हणजेच आयपीसी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा