IPL 2024 : आयपीएलमध्ये मोठा बदल, ‘या’ दोन सामन्यांच्या तारखा बदलायला लावल्या! जाणून घ्या कारण

WhatsApp Group

IPL 2024 | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या आगामी 2 सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामने पुन्हा शेड्युल करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्याची घोषणा केली.

आता ताज्या अपडेटनुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना जो पूर्वी 17 एप्रिल 2024 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार होता. आता तो एक दिवस आधी 16 एप्रिल 2024 रोजी खेळला जाईल. तर नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे 16 एप्रिल 2024 रोजी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना होणार होता. आता हा सामना 17 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, वानखेडेवर फ्लॉप शो, राजस्थान रॉयल्स ऑन टॉप!

सामन्याच्या तारखा का बदलल्या?

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17वा हंगामही सुरू आहे. 1 एप्रिलपर्यंत या स्पर्धेत एकूण 14 सामने झाले आहेत. रामनवमी आणि सुरक्षेमुळे बीसीसीआयने ताज्या अपडेटमध्ये दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे. कोलकाता पोलिसांनी या सामन्यासाठी सुरक्षा देण्यास नकार दिला होता. याचे कारण या दिवशी रामनवमीचा सण होता. कोलकाता पोलिसांनी आयपीएलचा हा सामना दुसऱ्या तारखेला आयोजित करण्याची सूचना केली होती. याच कारणामुळे 17 एप्रिल रोजी होणाऱ्या कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment