IPL 2024 MI vs KKR : आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. मोसमातील हा 51वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून केकेआरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नुवान तुषारा आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने केकेआरला 169 धावांवर ऑलआऊट केले. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. तर इम्पॅक्ट प्लेअर मनीष पांडेने 42 धावा जमवल्या.
मुंबईचा बेबी मलिंगा नुवान तुषाराने कोलकाताची वरची फळी गारद केली. त्याने फिल सॉल्ट (5), अंगक्रिश रघुवंशी (13), आणि सुनील नरिनला (8) माघारी धाडले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने किल्ला लढवला. कोलकाताचे इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने व्यंकटेश अय्यरसह 3 विकेट्स काढल्या. हार्दिक पांडयाला 2 विकेट्स मिळाल्या.
हेही वाचा – Health Insurance घेणाऱ्यांना धक्का, पॉलिसीचा प्रीमियम 10 ते 15% वाढणार!
एकीकडे मुंबई इंडियन्स संघाला गेल्या तीन सामन्यांत सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्स संघाची अवस्था वाईट आहे. 10 सामन्यांत तीन विजय मिळवून संघ गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 6 विजय नोंदवले असून त्यांचे 12 गुण आहेत. गेल्या सामन्यातही केकेआरने बाजी मारली होती.
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कप्तान), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरिन, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर (कप्तान), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा