IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, वानखेडेवर फ्लॉप शो, राजस्थान रॉयल्स ऑन टॉप!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs RR | राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर सहा गडी राखून पराभव करून इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत नऊ गडी गमावून 125 धावा केल्या. राजस्थानने सहा विकेट्स शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले. त्यांनी आता सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. मुंबईचा संघ आता 10व्या स्थानावर आहे.

राजस्थानकडून रियान परागने नाबाद 54 धावांची खेळी केली, त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह खेळी सजवली. मुंबईकडून आकाश मधवालने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. पण तो संघाला विजयी करू शकला नाही. तत्पूर्वी मुंबईची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना खातेही खोलता आले नाही. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन हादरे दिले. इशान किशनही 16 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कप्तान हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी अनुक्रमे 34, 32 धावांची खेळी केली. टिम डेव्हिडही मोठे फटके खेळू शकला नाही. चहल आणि बोल्ट यांनी 3-3 विकेट्स काढल्या. बर्गरला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – रोहित शर्मा आऊट झाला म्हणून सेलिब्रेशन करणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप, रुग्णालयात मृत्यू!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्विना मफाका.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment